सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील ‘या’ तरुण सरपंचाने काही दिवसातच केले पूर्ण गाव कोरोनामुक्त!

सोमवार, 31 मे 2021 (14:15 IST)
सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील घाटणे या गावातील तरुण सरपंच ऋतुराज देशमुख यांनी ‘बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह’ ही मोहीम राबवली आहे. तसेच या मोहिमेत ग्रामस्थांना एकत्र करून संपूर्ण गाव कोरोनामुक्त केलाय. मोहोळ तालुक्यातील घाटणे गावाने ही किमया साधली आहे.
 
मार्चपर्यंत एकाही कोरोना रुग्णाची नोंद गावात झाली नव्हती. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गावात पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रोजच रुग्ण आढळू लागले. अशा परिस्थितीमध्ये सरपंच ऋतुराज देशमुख यांनी ग्रामस्थांना एकत्र करत गावात ‘बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह’ ही मोहीम राबवली. गावकऱ्यांनीही यात सहभाग घेऊन सरपंचांना साथ दिली. परिणामी गावात कोरोना रुग्णसंख्येत घट होत गेली. सध्या गाव पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे.
 
गाव कोरोनामुक्त झालं असलं तरी लढाई अजून संपली नाही. गावात आता कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी काळजी घेत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. सोबतच लवकरात लवकर गावातील सर्वांचे लसीकरण करुन घेणार असल्याचेही ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती