म्हणून एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली

गुरूवार, 27 जानेवारी 2022 (21:49 IST)
एमपीएससी गट ब मुख्य परीक्षा न्यायालयीन कारणांमुळे पुढे ढकलल्याची माहिती एमपीएससी आयोगाकडून देण्यात आली आहे. 5 आणि 12 फेब्रुवारीला ही परीक्षा होणार होती. काही विद्यार्थ्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्यानं परीक्षा पुढे ढकलत असल्याची माहिती आयोगाकडून दिली गेली आहे. एमपीएससी आयोगाने ट्विट करत परीक्षा पुढे ढकलत असल्याची अधिकृत माहिती दिली नाही, काही विद्यार्थ्यांनी न्यायालयीन लढ्याचा मार्ग स्वीकारल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ एसपीएससी आयोगावर आली आहे. गेल्या काही महिन्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने अनेकदा एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे पाहिलं आहे. 
 
एमपीएसीच्या विद्यार्थ्यांनी हायकोर्टात जी याचिका दाखल केली आहे, त्यावर येत्या 2 फेब्रुवारीला सुनवाणी होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या सुनावणीकडे याचिकार्ते तसेच इतर विद्यार्थ्यांचेही लक्ष लागले आहे. ही सुनवणी पूर्व परीक्षा गट ब यासाठी असणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती