उजनी धरणात प्रवासी बोट बुडून सहा जण बेपत्ता

बुधवार, 22 मे 2024 (09:58 IST)
उजनी धरणाच्या पात्रात कळाशी ते कुगाव वाहतूक करणारी बोट धरणाच्या नदी पात्रात बुडाली असून या अपघातात सहा जण बेपत्ता झाले.
 
 इंदापूर तालुक्यात कळाशी गावातून सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या कुगाव येथे बोटीद्वारे वाहतूक केली जाते. संध्याकाळी कळाशी येथून नागरिकांना घेऊन जाणारी बोट अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे वेगाने पालटली. या अपघातात 6 जण बेपत्ता झाले असून अद्याप त्यांची नावे समजू शकली नाही. 
त्यांच्या शोध अद्याप लागू शकला नाही.  

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कळाशी तालुका इंदापूर येथे आज सायंकाळी वाहतूक करणारी एक बोट उलटली असून यातील काहीजण बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. वादळी वाऱ्यामुळे ही घटना घडल्याचं सांगण्यात येत असून या बोटीमध्ये एकूण सात प्रवाशी प्रवास करत होते. यातील एकजण सुखरूप असून बाकीच्या सहा जणांचा शोध सुरू आहे.
 
Edited by - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती