रक्ताच्या तुटवड्यामुळे अनेक रूग्णांचे नातेवाईक ब्लड बँकांमध्ये रक्ताचा शोध घेण्यासाठी झगडत असल्याचे दिसून आले. शहरातील अनेक ब्लडबँकांनी त्यांच्याकडे मोजक्याच ब्लड ग्रुप्सचा साठा शिल्लक असल्याचे सांगितले आहे. रक्ताच्या या तुटवड्यामुळे नियोजित शस्त्रक्रियांचे वेळापत्रक बदलले जाऊ शकते. वृत्तनुसार दिवाळीमुळे मर्यादित स्वरूपात रक्तदान मोहिम राबवण्यात आली होती. त्यामुळे, शहरात आणि आसपासच्या भागांमधील रक्तपढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला.
ब्लड बँकांमधील रक्ताचा साठा हा शून्यावर
रविवारी, बीवायएल नायर रुग्णालय वगळता अनेक ब्लड बँकांमधील रक्ताचा साठा हा शून्यावर आला होता. शिवाय, रक्तसाठा उपलब्ध आहे का? अशी विचारणा डॉक्टर आणि रक्तपेढीचे कर्मचारी यांच्यामध्ये सुरू होती. परिणामी, या रक्ताच्या तुटवड्यामुळे रूग्णालयांतील नियोजित शस्त्रक्रियांचे वेळापत्रक पुढे ढकलले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.