दिवाळीला रेल्वेचे आरक्षण फुल होते. त्यामुळे लांबचा प्रवास करणाऱ्यांनी गर्दीचा फायदा घेत फुकटात प्रवास केला. रेल्वेने अशा फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली असून त्यांच्या कडून दंड आकारला. सणासुदीच्या वेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि फुकट्या प्रवाशांवर आळा घालण्यासाठी रेल्वे तिकीट तपासणी मोहीम राबवते. या मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वेने तब्बल 41 हजार हुन अधिक फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत 3 कोटी 73 लाखाचा दंड वसूल केला भुसावळ विभागात ही कारवाई 9 ते 15 नोव्हेंबर दरम्यान केली.