विकी भांगे (वय, ३० रा.पुसद, यवतमाळ) असे गोळीबार करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. तर निलेश सुधाकर पवार ( वय, २७ पुसद हल्ली मुक्काम, गोरेगाव मुंबई) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबईतील गोरेगाव येथून साईबाबांची पालखी शिर्डीच्या दिशेने निघाली होती. याच पालखीमध्ये विकी भांगे आणि सुधाकर पवार सहभागी झाले होते. मागिल राग मनात धरून भांगे याने पालखी शिर्डीमध्ये पोहोचल्यानंतर पवार याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये निलेश पवार हा जखमी झाला असून त्याच्यावर शिर्डीमधील साईबाबा रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. गोळीबार करणाऱ्या भांगे या तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे.