धक्कादायक ! पत्नीनेच पतीला बिअर पाजून गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला

बुधवार, 31 जानेवारी 2024 (14:57 IST)
पती-पत्नीचं नातं विश्वासांवर अवलंबून असत.पती पत्नी मध्ये वाद होणं हे सामान्य आहे. पती पत्नीच्या नात्यात विश्वास नसेल तर या नात्याला काहीच अर्थ राहत नाही. एका पत्नीने आपल्या पतीला आयुष्यातून काढण्यासाठी त्याचा काटाच काढला आणि त्याला बिअर पाजून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने पती वाचला आणि तिच्या तावडीतून कसाबसा  सुटला आणि आपला जीव वाचवला.

हे प्रकरण आहे नाशिकच्या म्हसरूळचे  विशाल पोपटराव पाटील असे या पतीचे नाव असून त्याने आपली पत्नी एकता राजेंद्र जगतापच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.   

विशालने दिलेल्या फिर्यादी वरून त्याचे व त्याच्या पत्नी एकताचे नेहमी आर्थिक कारणांवरून वाद व्हायचे.काही दिवसांपूर्वी ती त्याला सोडून घरातून निघून गेली होती. नंतर परत आली. 

एकताने गेल्या शनिवारी 27 जानेवारी रोजी त्याला बिअर आणायला सांगितले. त्याने माझ्याकडे पैसे नाही असं म्हणत नकार दिला. पत्नीने त्याला बिअर आणण्यासाठी पैसे दिले. तो रात्री हॉल मध्ये बसून बिअर पीत असताना मागच्या दारातून एक अज्ञात व्यक्ती घरात शिरला आणि त्याने विशालचा गळा मागून आवळला. पत्नी ने समोरून उशी तोंडावर ठेऊन त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्या अज्ञात इसमाने सोबत आणणेल्या  सॅक मधून विषारी साप काढत विशालच्या गालावर दंश केला. 

विशालने कसाबसा स्वतःला त्यांच्या तावडीतून सोडवत रुग्णालय गाठले आणि वेळीच उपचार मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचला. या प्रकरणी विशाल ने पत्नी आणि अज्ञाताच्या विरोधात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्या पत्नी एकता व तिचा साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ती पसार झाली असून पोलीस दोघांचा शोध घेत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती