केशव उपाध्ये यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर पलटवार केला. पहिल्यांदा शिवसेना भवन हतबद्ध अन हळहळत असेल. सळसळत्या हिंदुत्वाचे हुंकार समोर आहे पण त्याला साथ देता येत नाही, कारण उध्दव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडल आणि मुस्लिमांची परिषद घेणाऱ्यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दारात नेऊन ठेवले. बाकी हिंदू समर्थ आहे, असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले आहे.
दरम्यान, लव्ह जिहादच्या विरोधातील हा मोर्चा काढण्यात आला. हे हिंदू राष्ट्र व्हावे ही आमची मागणी आहे. विधान परिषद आणि विधानसभेत लव्ह जिहादच्या कायद्याची मागणी करणार आहोत. महिलांच्या हितासाठी हा मोर्चा काढला. उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडले. आता त्यांनी फक्त एमआयएमसोबत युती करणं बाकी आहे. हिंदुत्ववादाच्या विरोधात जाऊन ते राजकारण करत आहेत, अशी टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली.