संजय राऊत यांचे मुख्यमंत्री यांना त्यांच्या मुलाची जागा वाचवण्याचे आव्हान

शनिवार, 28 जानेवारी 2023 (15:29 IST)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मुलाची जागा वाचवण्याचे आव्हान दिले आहे. मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जेव्हा त्यांच्या सोयीचे सर्व्हे असतात तेव्हा त्यांना हवे असतात. राष्ट्रीय स्तरावरचा सर्व्हे भाजपच्या बाजूने आहे, तो त्यांना हवाय. पण महाराष्ट्रातला सर्व्हे त्यांच्या विरोधातील आहे. तो त्यांना नकोय. त्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला साधारण ३४ जागा मिळतील असा अंदाज आहे. पण आम्ही म्हणतो या जागा ४० ते ४५ असतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. याआधी  महाविकास आघाडीच्या चार-पाच जागा निवडून आल्या तरी पुरे, असे म्हटले होते. यावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान दिले. 
 
मुख्यमंत्री म्हणाले, ४ ते ५ जागा मिळवल्या तरी पुरे. माझे म्हणणे आहे. त्यांनी कल्याण-डोंबिवलीची जागा वाचवली तरी पुरे, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. दुसरीकडे, वंचित आघाडीचा महाविकास आघाडीत जाण्याबाबतचा प्रस्ताव आला नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांचे म्हणणे खरे आहे. अजूनही महाविकास आघाडी म्हणून वंचित बरोबर युती झाली नाही. चर्चा फक्त वंचित आणि शिवसेनेसोबतच झाली आहे, अशी माहिती संजय राऊतांनी दिली. 

Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती