शिवजयंती वाद, तिथीचा हट्ट सोडा, आता शिवसेना काय करणार ?

मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020 (16:23 IST)
तिथीचा हट्ट सोडून १९ फेब्रुवारी शिवजयंतीची तारीख जाहीर केली जावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे आवाहन केलं आहे. “तिथीचा हट्ट सोडा आणि १९ फेब्रुवारीलाच शिवजंयतीची तारीख जाहीर करा,” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 
 
शिवसेना दरवर्षी तिथीनुसारच शिवजयंती साजरी करते. भाजपासोबत युती असतानाही शिवसेनेने वारंवार शिवजयंती तिथीनुसार साजरी व्हावी अशी मागणी केली होती. मात्र यावेळी राजकीय परिस्थिती वेगळी आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित सत्तेत आहे.  आता राष्ट्रवादीच्या या आवाहनाला शिवसेना काय प्रतिसाद देणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती