परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. अ परिमंडळ कार्यालयाच्या हद्दीतीतील 11 शिवभोजन केंद्रांवर शिवभोजन थाळीची वेळ बदलण्यात आली आहे. शिव भोजन केंद्राची बदललेली वेळ उद्यापासून ( गुरुवार) लागू करण्यात येणार आहे. शिवभोजन थाळीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी सकाळी 7 ते 11 या वेळेत आपापल्या परिसरातील शिवभोजन केंद्रांवर उपस्थित राहावे, असे आवाहन तावरे यांनी केले आहे.