आगामी निवडणूकांच्या संदर्भात शरद पवार यांचं मोठं विधान, म्हणाले…

शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (15:50 IST)
ऊस उत्पादकांना बिले देण्यासाठी जुनीच पद्धत योग्य असल्याचे सांगत महाविकास आघाडी  सरकार टिकवायचे असेल तर सर्वांनी उद्धव ठाकरे  यांना साथ द्यावी. आगामी सर्वच निवडणुका एकत्र लढण्याचा विचार सुरू असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने  आयोजित केलेल्या मेळाव्यात शरद पवार बोलत होते. आयकर विभागाने  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर छापे मारले. त्यावरूनही पवारांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, अजित पवारांकडे काही सरकारी पाहुणे पाठवल्याच्या काही जणांनी चिठ्ठ्या मला पाठवल्या. पण आपल्याला पाहुण्यांची चिंता नसते. विधानसभा निवडणुकीआधी एका बँकेच्या प्रकरणात मला ईडीने (ED) नोटीस पाठवली होती. ईडीने मला नोटीस दिली आणि भाजपला महाराष्ट्रातील लोकांनी येडे ठरवले. आता त्यांनी अजित पवार यांच्याबद्दलही काही गोष्टी केल्या असतील. सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल महाराष्ट्रातील लोक भाजपला  पुन्हा धडा शिकवतील.
 
सभेत शरद पवार  यांनी विधानसभा निवडणूकीनंतर सरकार स्थापनेवेळी निर्माण झालेल्या स्थितीची आठवण करून दिली. ते म्हणाले, भाजपने 106 आमदारांच्या जोरावर सत्ता स्थपनेचा दावा केलं अन आमच्या 54 आमदारांची पळापळ सुरु झाली. काँग्रेस, सेनेसोबत बैठक घेतली. सर्वजण शांत बसले होते. सर्वांचंच डोक थंड होत. तेवढ्यात शेजारी बसलेले उद्धव ठाकरे यांचे हात उंचावून हाच आमचा मुख्यमंत्री असे म्हणताच महाराष्ट्र स्तब्ध झाला होता. कामे कुठे होतात हे कार्यकर्त्यांना माहित आहे. हे सरकार आपल्याला टिकवायचं आहे असेही त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती