वृद्ध शेतकरी दाम्पत्याची कीटकनाशक घेऊन आत्महत्या

शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (15:46 IST)
सोलापूर- एका धक्कादायक घटनते मोहोळ तालुक्यातील खंडाळी गावच्या शिवारात एका वृध्द शेतकरी दाम्पत्याने विष घेऊन आत्महत्या केली. यामागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही. शुक्रवारी हा प्रकार उघडकीस आला. 65 वर्षीय पोपट बाबुराव मुळे आणि 57 वर्षीय कमलबाई पोपट मुळे अशी आत्महत्या केलेल्या वृध्द दाम्पत्याची नावे आहेत. 
 
खंडाळी गावच्या शिवारात मुळे दाम्पत्य स्वत:ची शेती करीत होते. गुरुवारी सायंकाळी पती—पत्नी घरातून बाहेर पडले आणि रात्री उशीर झाल्यावरही पुन्हा घरी न परतल्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोधाशोध सुरू केला. रात्रभर शोधूनही दाम्पत्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. 
 
दरम्यान, शुक्रवारी देखील शोध सुरू असताना ते आपल्याच शेतातील टोमॅटोच्या प्लॉटमध्ये लिंबाच्या झाडाखाली बेशुध्दावस्थेत पडलेले आढळून आले. दोघांच्याही तोंडातून फेस येत होता ज्याने कीटकनाशक विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती