सदर महिला रोजगारासाठी मालेगाव एमआयडीसी परिसरात राहत होती.आरोपींच्या ओळखीच्या दोन महिलांनी पीडितेला रोजगार मिळवून देण्याच्या नावाखाली एका घरात नेले आणि महिनाभर तिला कोंडून ठेवले आणि तिच्यावर दोन पुरुषांनी अत्याचार केला. तसेच तिचे धर्मांतर करून देण्याच्या आमिष दाखवत एका फादरने तिला गुंगीचे औषध देऊन फादरसह दोन पुरुषांनी तिच्यावर महिनाभर तिच्यावर अत्याचार केला. घटना 30 नोव्हेंबर 2022 ते 29 डिसेंबर 2022 या दरम्यान घडली .तसेच तिच्या मुलांवर भीक मागण्याची पाळी आली आहे. पीडित महिलेने या घटनेची तक्रार सिन्नर पोलीस ठाण्यात 4 फेब्रुवारी रोजी केली. या प्रकरणात पोलिसांनी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून एक जण फरार असून चौघांना अटक केली आहे. आरोपीना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.