महाशिवरात्रि पर्यंत विशाळगडावर जर प्रशासनाने बेकादेशीर बांधकाम पाडली नाहीत तर तमाम शिवभक्त अतिक्रमण काढतील असा इशारा विशाळगड संवर्धन समितीने पत्रकार परिषदेत दिला. विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधातल्या कारवाईमध्ये कारसेवक म्हणून सहभागी व्हायचा आहे त्यांनी कोल्हापुरातील मिरकर तिकटी येथे त्यांची नाव नोंदणी करावे, असे आवाहन यावेळी केले.
विशाळगड राज्यपुरातत्वचा ताब्यात असून या ठिकाणी राज्य पुरातत्त्वचे कुठलेही निकष पाळले जात नाही. या ठिकाणी बेकादेशीरपणे बांधकाम करून कुठलीही राज्यपुरातत्त्वची एनओसी न घेता बांधकाम करून या विशाळागडावर पुरातत्व कायद्याचाही सर्रास भंग केला आहे. या सर्व गोष्टी युवराज संभाजी राजे छत्रपती, आमदार विनय कोरे आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांच्या निदर्शनास आणले आहे. तरी सुद्धा या सर्व वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा हे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी पाठिंबा असताना सुद्धा काही झारीतील शुक्राचार्य या ठिकाणचे बेकादेशीर बांधकाम पडूनये यासाठी म्हणून प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर बेकादेशीर बांधकाम केलेली बाहेरून आलेल्या व्यक्ती या न्यायालयात जाऊन या सगळ्या प्रक्रियेला खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप विशाळगड दुर्ग संवर्धन समितीने केल
विशाळगड हा मराठ्यांची अस्मिता आणि या किल्ल्यावर झालेली बेकादेशीर बांधकाम त्वरित पाडून टाकावीत. ज्यांनी या किल्ल्यावर असे बेकायदेशीर कृत्य केलेले आहेत बांधकाम केलेले आहेत त्यांच्यावर पुरातत्व च्या कायद्यानुसार गुन्हे नोंद करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी विशाळगड संवर्धन समितीने केली आहे. महाशिवरात्रीपर्यंत या बेकायदेशीर बांधकामावर जर हातोडा पडला नाही तर शिवभक्त स्वतः शिवछत्रपतींचा हा किल्ला बेकायदेशीर बांधकामातून अतिक्रमणातून मुक्त करण्याची कारवाई करतील, असा इशारा देत कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असे सांगितले.