ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठं वक्तव्य केलं आहे. अविमुक्तेश्वरानंद सरस्वती सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्रीवर पोहोचले.आणि उद्धव ठकरे यांची भेट घेतली. ते म्हणाले, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला आहे. ज्याचा विश्वासघात झाला तो खरं हिंदू आहे.ज्याने जगाचा विश्वासघात केला तो खरा हिंदू नाही.स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराजाना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसलेले पाहायचे आहे.
दिल्लीत केदारनाथ धाम बांधण्याच्या प्रश्नावर स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, 'प्रतिकात्मक केदारनाथ बांधता येणार नाही. बारा ज्योतिर्लिंगे विहित आहेत. त्याची जागा निश्चित आहे. हे चुकीचे आहे.पुराणात देखील म्हटले आहे, 'केदारं हीम पृष्ठे ' मग दिल्लीत केदारनाथ कसे नेणार? ते म्हणाले, आमच्या मंदिरात राजकारणी येत आहेत. केदारनाथमध्ये 228 किलो सोन्याचा घोटाळा झाला होता. त्याची कोणालाच पर्वा नाही.
अनंत अंबानींच्या लग्नात पंतप्रधान मोदींना दिलेल्या आशीर्वादाच्या प्रश्नावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमचे आशीर्वाद घेतले, आम्ही त्यांना दिले. ते आमचे शत्रू नाहीत. आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहे.