वसंत मोरे यांचा उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश

मंगळवार, 9 जुलै 2024 (18:33 IST)
पुणे लोकसभा निवडणूक वंचित आघडी कडून लढलेले वसंत मोरे यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांचा समवेत अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील पक्ष प्रवेश केला. 

या पूर्वी मोरे यांनी पुणे ते मुंबई दरम्यान शक्ती प्रदर्शन केले. ते मोठ्या ताफ्यासह मातोश्री येथे दाखल झाले आणि त्यांनी पक्ष प्रवेश केला. 

मोरे हे पूर्वी शिवसेनेत होते त्यांनी या पक्षात शाखा प्रमुख ते विभाग प्रमुख म्हणून काम केले. नंतर ते मनसे मध्ये गेले आणि पुणे महापालिकेचे नगर सेवक म्हणून तीन वेळा निवडून आले. त्याची पुणे महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून काम पहिले आहे. 

वंसत मोरे यांनी 2024 मध्ये मनसेला सोडले आणि नंतर शरद पवार गटाकडून पुणे लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र माविआ मध्ये पुण्याची जागा काँग्रेसच्या पक्षात गेली आणि रवींद्र धंगेकर उमेदवार म्हणून उभे राहिले नंतर मोरे यांनी वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक लढवली त्यात त्यांचा पराभव झाला 
आता त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे त्यांनी हा पक्षप्रवेश विधानसभा निवडणुकांना लक्षात घेत केला आहे.

या वर प्रतिक्रिया देत ते म्हणाले, मी शिवसेनेत प्रवेश केला नसून आता पुन्हा शिवसेनेत आलो आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाची ताकद वाढणार असल्याचे वंसत मोरे म्हणाले. 

 Edited by - Priya Dixit    
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती