काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांची कन्या तथा प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांचा एक व्हिडीओ तुफान वायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिवानी वडेट्टीवार यांनी, बलात्कार हे राजकीय शस्त्र असून हे शस्त्र तुम्ही आपल्या राजकीय विरोधात वापरले पाहिजे, असे सावरकरांचे विचार होते असे म्हटले आहे. तसेच या विचारामुळे महिलांना भीती वाटत असल्याचेही त्या बोलताना दिसून येत आहे. या व्हिडीओमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.