संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना जामीन मंजूर

मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (09:19 IST)
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कोरोना काळातील कथित जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना किल्ला कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात सुजित पाटकर यांना जामीन मंजूर झाला आहे.
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , कोरोना काळातील कथित जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळाचे आरोप सुजित पाटकर यांच्यावर होते. अनेकदा छापेमारी आणि चौकशीनंतर ईडीकडून सुजित पाटकर यांना ऑगस्ट २०२३ मध्ये अटक करण्यात आली होती. आता तब्बल पाच महिन्यानंतर किल्ला कोर्टाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे.
 
कोर्टाकडून सुजित पाटकर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १ लाख रुपयांच्या पर्सनल बाँडवर पाटकर यांचा जमीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच पाटकर यांना कोर्टाच्या परवानगीविना देश सोडण्यास मज्जाव केला असून त्यांचा पासपोर्ट कोर्टाकडे सुपूर्द करावा लागणार आहे.
 
काय आहे जम्बो कोविड सेंटर घोटाळा?
बनावट कागदपत्रांच्या आधारे दहिसर आणि वरळी येथील जंबो कोव्हिड सेंटरच कंत्राट मिळवल्याचा आहे सुजित पाटकर यांच्यावर लावण्यात आला होता. कोविड काळात सुजीत पाटकर यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचे गंभीर आरोप त्यांच्यावर होते. या प्रकरणी ईडीकडून सुजित पाटकर यांची अनेकदा चौकशी करण्यात आली होती. तसेच त्यांच्या घरावरही छापेमारी करण्यात आली होती. 

Edited By -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती