संजय राऊत म्हणाले . कदाचित नवीन चिन्ह हे शिवसेनेसाठी क्रांती घडवेल

सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (14:48 IST)
तुरुंगात असलेले खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना सडोतोड प्रत्युत्तर दिलं आहे. नाव गोठवलं असलं तरीही शिवसेना तीच आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
संजय राऊतांची आज कोठडी संपली आहे. त्यासाठी त्यांना कोर्टात आणले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संवाद साधताना त्यांनी शिवसेना पुन्हा जोमाने उभी राहील असाही निश्चय बोलून दाखवला आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह आणि नाव कायमचं गोठवलं तर पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावरून संजय राऊत म्हणाले की, नाव गोठवलं असलं तरीही शिवसेना तीच आहे. कदाचित नवीन चिन्ह हे शिवसेनेसाठी क्रांती घडवेल, असाही ठाम निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे.
संजय राऊत म्हणाले, कदाचित नवीन चिन्ह हे शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. ही पहिली वेळ नाही, यापूर्वी इंदिरा गांधी देखील अशाच परिस्थितीतून गेल्या होत्या. काँग्रेसचे तीन वेळा चिन्ह गोठवले होते, तर जनता दलाचेही चिन्ह गोठवले होते.
नावात काय…शिवसेना नाव गोठवले तरी शिवसेना तीच आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपूर्वी धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला इतक्या सहजासहजी मिळणार नाही, असंही राऊत म्हणाले. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक संताप व्यक्त केला जात आहे, राऊतांनीही मुख्यमंत्र्यांवर यावेळी टीका केली.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती