मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान जपान आणि चीनला भेट देणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृतपणे कार्यक्रम जाहीर केला आहे. पंतप्रधान ३० ऑगस्ट रोजी जपानला भेट देतील, जिथे ते भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची भेट घेतील. यादरम्यान, भारत आणि जपानमधील गुंतवणूक आणि धोरणात्मक सहकार्य यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. त्यानंतर, ते ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान चीनच्या तियानजिन शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीत सहभागी होतील.
या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल
या भेटीदरम्यान, दोन्ही पंतप्रधान भारत आणि जपानमधील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीचा आढावा घेतील, ज्यामध्ये संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष आणि लोक-ते-लोक देवाणघेवाण यांचा समावेश आहे. यासोबतच, प्रादेशिक आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा केली जाईल. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील दीर्घकालीन विशेष मैत्रीपूर्ण संबंध पुन्हा दृढ होतील.
तसेच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून, भेटीच्या दुसऱ्या टप्प्यात, पंतप्रधान मोदी ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२५ दरम्यान तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एसजीओ) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला भेट देतील. शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या अनेक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेण्याची अपेक्षा आहे.