यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी शनिवारी सांगितले की, ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. तहव्वुर राणालाअमेरिकेकडून भारतात पाठवले जाणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. आता फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली असलेल्या नीरव मोदीला भारतात परत आणण्याची वेळ आली आहे.
संजय राऊत म्हणाले की, मेहुल चौकसी, दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमनसह इतर फरारी लोकांनाही परत आणले पाहिजे.त्यांना कधी भारतात आणणार.
संजय राऊत पत्रकारांना म्हणाले, “ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. अशा न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहतात. आता नीरव मोदीला आणावे लागेल, दाऊदला आणावे लागेल, टायगर मेमनला आणावे लागेल. यादी मोठी आहे.”