पुण्यात माजी उपमहापौरांच्या मुलाची गुंडगिरी दुचाकीस्वाराला कानशिलात लगावली, गुन्हा दाखल

शनिवार, 25 जानेवारी 2025 (15:37 IST)
पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मुलाच्या विरोधात ट्रेफिक सिग्नलवर मोटरसायकल  स्वाराला कानशिलात लगवण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही संपूर्ण घटना उघडकीस आली, ज्यामध्ये एका ट्रॅफिक सिग्नलवर मोटारसायकल दोन कारमध्ये अडकल्याचे दिसत आहे.या प्रकरणी पोलिसांनी तक्राराची नोंद घेऊन तपास सुरु केला आहे. 
ALSO READ: पुण्यात आरएमसी मिक्सर ट्रक स्कूटरवरून जाणाऱ्या दोन महिलांवर उलटला
पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांचा मुलगा हेमंत बागुल यांच्यावर मंगळवार पेठेतील ट्रेफिक सिग्नलवर एका मोटरसायकल स्वाराला कानशिलात लगावण्या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनाचा दरवाजा उघडला असता तक्रारदार सय्यद  यांची दुचाकी बागुल यांच्या कारला धडकली. या वरुन बागुल हे सय्यद यांच्याशी गैरवर्तन करु लागले अणि सय्यद यांच्या कानशिलात लगावली. सय्यद यांनी धमकी दिल्याचा दावा बागुल करत आहे.   

या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात दोन्ही पक्षांकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या असून प्रत्येकाच्या तक्रारीच्या आधार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहे.  
Edited By - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती