पंतप्रधान मोदींनी निवृत्तीची घोषणा करण्यासाठी आरएसएस कार्यालयात भेट देण्याचा संजय राऊतांचा दावा

सोमवार, 31 मार्च 2025 (12:19 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातील संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. या मागील कारणांचा मोठा खुलासा संजय राऊतांनी केला आहे. 
ALSO READ: आरएसएस स्वयंसेवक स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी काम करतात-मोहन भागवत
मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना यूबीटीचे नेते संजय राऊत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्रमोदींनी निवृत्तीची घोषणा करण्यासाठी नागपूरच्या संघ मुख्यालयाला भेट दिली. माझ्या माहितीनुसार, त्यांनी गेल्या 10 वर्षात कधीही आरएसएस मुख्यालयाला भेट दिलेली नाही. 
 
आता आरएसएसच्या विचारसरणीत बदल होत आहे. मोदीजी भागवतांना ते निवृत्ती घेत असल्याचे सांगण्यासाठी गेले आहे. संघाच्या संचालकांसह सम्पूर्ण संघ परिवाराला आरएसएस नेत्तृत्वाला बदल हवा आहे. संघाला स्वतःच्या इच्छेने भाजपचा अध्यक्ष निवडायचा असल्याचे ते म्हणाले. 
ALSO READ: आरएसएस मुख्यालयाच्या भेटीवर संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला
काल संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींची आरएसएस मुख्यालयाच्या भेटीचा संबंध बिहार निवडणुकीशी जोडला होता.संजय राऊत म्हणाले, आज पंतप्रधान मोदी संघाच्या मुख्यालयाला भेट देण्यासाठी गेले आहे. ही चांगली गोष्ट आहे. या पूर्वी ते कधीही गेलेले नाही. आता संघाचे कार्यकर्ते जरी लोकसभेत सक्रिय नाही पण ते महाराष्ट्रात सक्रिय आहे. म्हणूनच मोदीजी संघाच्या प्रमुखांना भेटायला गेले असावे.महाराष्ट्रात संघाच्या सक्रियतेमुळे निवडणुकीत सरकारला मोठा विजय मिळाला. आता भाजप बिहार निवडणुकीसाठी देखील हीच पद्धत अवलंबू इच्छिते.
Edited By - Priya Dixit
 
ALSO READ: प्रत्येक गोष्टीवर वाद निर्माण करण्याची गरज नाही, वाघ्याच्या स्मारकावर फडणवीसांचे विधान
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती