Kunal Kamra controversy: स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांच्याशी संवाद साधला. राऊत यांनी कामरा यांना पोलिसांसमोर आपला मुद्दा मांडण्यास आणि कायद्याचे पालन करण्यास सांगितले. अशी माहिती समोर आली आहे. राऊत म्हणाले की, मुंबई पोलिस खूप सक्षम आहे आणि कामराला संरक्षणाची गरज आहे, ज्याप्रमाणे कंगना राणौतला तिच्या विरोधात निदर्शने झाली तेव्हा तिला सुरक्षा देण्यात आली होती. कुणाल कामरा हा दहशतवादी नाही, तो एक कलाकार आणि लेखक आहे. असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
"महाराष्ट्र सरकारने कुणाल कामराला विशेष सुरक्षा द्यावी अशी माझी मागणी आहे. असे राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच आर्टिस्टविरुद्ध आणखी ३ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, कुणाल कामरा विरुद्ध एक तक्रार जळगाव शहराच्या महापौरांनी दाखल केली आहे, तर इतर दोन तक्रारी नाशिकमधील एका हॉटेल व्यावसायिक आणि एका व्यावसायिकाकडून आल्या आहे. २७ मार्च रोजी, मुंबई पोलिसांनी विनोदी कलाकाराला या प्रकरणात पुढील चौकशीसाठी ३१ मार्च रोजी खार पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितले होते. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी खार पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात कामरा यांना बजावण्यात आलेला हा तिसरा समन्स आहे. पहिल्या दोन समन्समध्ये तो पोलिसांसमोर हजर राहण्यात अयशस्वी झाला आहे.
तसेच शुक्रवारी, मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामराला त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या अनेक एफआयआर प्रकरणी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती सुंदर मोहन यांनी ७ एप्रिलपर्यंत अटींसह अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले.