Samruddhi Accident: वाशीम -समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात

Webdunia
शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (13:26 IST)
आज सकाळी वाशीम जिल्ह्यात कारंज्याच्या दोनद गावाजवळ ट्रक चालकाला डुलकी लागून ट्रक दुभाजकाला धडकून आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण अपघातात ट्रक जळून खाक झाला आहे. 
 
वाशीम -समृद्धी महामार्गावर ट्रकचा दुभाजकावर धडकून भीषण अपघात झाल्याचे वृत्त मिळाले आहे. ट्रक चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला. सकाळी 6:30 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. सध्या समृद्धी महामार्गावर अपघाताचे स्तर सुरूच आहे. वाशीम जिल्ह्यात कारंजाच्या दोनद गावाजवळ अपघात झाला.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. 



Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

पुढील लेख