संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेने संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेने देखील नाशिक जिल्ह्यात पहिले खाते उघडले असून संघटनेच्या महिला कार्यकर्त्या ग्रामपंचायतीवर निवडून आल्या आहेत. त्यामुळे एकच जल्लोषाचे वातावरण होते. त्यांची नाशिकमधील गणेश गावात आपले खाते उघडले असून रूपाली ठमके यांनी हा विजय मिळवला आहे.
नाशिक तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी काल पार पडलेल्या मतदानानंतरमतमोजणीला सुरुवात झाली आहे. या १६ ग्रामपंचायत पैकी ८ ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून, यात ८ ग्रामपंचायतीत शिवसेना २, भाजप १, राष्ट्रवादी ३, काँग्रेस १ स्वराज्य संघटना १ असा निकाल हाती आला आहे. त्यातच महाराष्ट्रातून पहिला विजय हा स्वराज्य संघटनेला नाशिकच्या गणेश गावातून मिळाला आहे. स्वराज्य संघटनेचा विजयाचा श्रीगणेशा हा नाशिक जिल्ह्यातील गणेश गावातील एका महिलेच्या रूपाने मिळाला आहे.
नाशिक तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वराज्य संघटनेचे पुरस्कृत उमेदवार देण्यात आलेले होते. ग्रामपंचायत निवडणुकीत रूपाली ठमके यांना स्वराज्य संघटनेच्या पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती. स्वराज्य संघटना हा सध्या पक्ष नसला तरी स्वराज्य संघटना पुरस्कृत म्हणून निवडणुकीत उमेदवारी देण्याचे कामे केले होते. नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील बहुतांश ठिकाणी स्वराज्य संघटना पुरस्कृत उमेदवार देण्यात आले.
नाशिक तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी पार पडलेल्या मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या १६ ग्रामपंचायत पैकी ८ ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून, यात ८ ग्रामपंचायतीत शिवसेना २, भाजप १, राष्ट्रवादी ३, काँग्रेस १ स्वराज्य संघटना १ असा निकाल हाती आला आहे.