रुपाली पाटील ठोंबरें हातात बांधणार घड्याळ

गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (13:03 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकल्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याविषयी गेल्या दोन दिवसांपासून उलटसुलट चर्चा होती. त्या चर्चेला रुपाली पाटील यांनी आज पूर्णविराम देत एक खास ट्वीट केलं आहे. पाटील यांनी आपल्या पुढील राजकीय प्रवासाची दिशा जाहीर केली आहे. 
 
त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व शिवसेनेचे युवा नेते वरुण सरदेसाई यांची भेट घेतली होती त्यामुळं राष्ट्रवादी की शिवसेना कोणत्या पक्षाची निवड करणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, योग्य वेळी आपण पक्षाचं नाव जाहीर करू, असं रुपाली पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. आज त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.
 

आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय’ दिसत नाहीत ; हो म्हणूनच ठरलंय ! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार ...@NCPspeaks @ShivSena@INCIndia

— Rupalipatilthombare (@Rupalispeak) December 16, 2021
रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 'आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे 'हात' नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे 'पाय' दिसत नाहीत! हो म्हणूनच ठरलंय! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार,' असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

photo: twitter

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती