कोरोनासंबंधी नियमांचं पालन न करणाऱ्या मालिका-चित्रपट निर्मात्यांवर कारवाई करण्याची धमक दाखवावी, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केले आहे. कोरोनाची आकडेवारी कमी होत असल्यास शूटिंगसाठी बनवलेल्या नियमांचा नव्याने विचार करावा, असंही खोपकरांनी सुचवलं आहे.
“कोरोनाचं संकट अजून दूर झालेलं नाही, असं खरंच यंत्रणांना वाटत असेलस तर मग जे नियम पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक त्यांनी दाखवावी. आणि जर कोरोनाचे आकडे कमी होत असतील तर सरकारने शूटिंगसाठी बनवलेल्या नियमांचा नव्याने विचार करावा, तरच या इंडस्ट्रीत सगळं काही पुन्हा सुरळीत होऊ शकेल.” असं मतही अमेय खोपकर यांनी व्यक्त केलं आहे.