‘आरपीआय’ला सत्तेत चांगला वाटा मिळाला पाहिजे-रामदास आठवले

बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (07:58 IST)
रामदास आठवले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यात चर्चा झाली. या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भाजपासोबत निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी ‘आरपीआय’ला सत्तेत चांगला वाटा मिळाला पाहिजे, अशी मागणी आठवलेंनी फडणवीसांकडे केली आहे.
 
‘आरपीआय’ हा पक्ष २०१२ पासून भाजपासोबत आहे, त्यामुळे तुमच्याकडे दुर्लक्ष होणार नाही. आरपीआयला नक्कीच सत्तेचा वाटा मिळेल, अशी भूमिका फडणवीसांनी घेतली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी दिली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आम्ही कसल्याही परिस्थितीत जिंकणार आहोत. आरपीआयची सर्व ताकद भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत असेल, अशी प्रतिक्रिया आठवलेंनी दिली आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती