चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम थोडे शिथिल, नवीन मार्गदर्शकतत्व लागू

Webdunia
मंगळवार, 19 मे 2020 (17:21 IST)
महाराष्ट्र सरकारने चौथ्या टप्प्याच्या लॉकडाउनसाठी मार्गदर्शकतत्वे जाहीर केली आहेत. चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत. २२ मे पासून नवीन आदेश लागू होणार असून ते ३१ मे पर्यंत कायम राहतील. 
 
मुंबई महानगर प्रदेशासह पुणे, नाशिक, सोलापूर, मालेगाव, सोलापूर, जळगाव, अकोला, अमरावती. औरंगाबाद ही महापालिका क्षेत्र रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये फक्त जीवनावश्यक गोष्टींना परवानगी देण्यात येईल.
 
हे बंद राहणार
ट्रेन, मेट्रो, विमान सेवा, आंतरराज्य रस्ते वाहतूक, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, हॉटेल, मॉल, प्रार्थनास्थळे, सलून, स्पा बंदच राहणार
रेड झोनमध्ये टॅक्सी, रिक्षाला, खासगी बांधकाम साईटस, खासगी कार्यालयांना, शेती कामांना परवानगी नाही.
 

संबंधित माहिती

पुढील लेख