आमदार हेमंत टकले बनले राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस

शनिवार, 8 सप्टेंबर 2018 (15:55 IST)
अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणारे आमदार हेमंत टकले यांच्यावर राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय स्तरावरील चिटणीसपदाची आणखी एक महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. टकले हे राजकारण आणि सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहेत.
 
विधान परिषद सभागृहामध्ये वेगवेगळया विषयांवर प्रभावी मांडणी करणे आणि त्या विषयाचे गांभीर्य सरकारपर्यंत पोचवण्याचा त्यांचा विशेष हातखंडा आहे. तसेच कला-साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रात टकले यांना दांडगा अनुभव आहे. राष्ट्रवादीच्या मासिकामध्ये शेवटच्या पानावर त्यांचे विशेष ‘सदर’ सुरु आहे. विधान परिषदेमध्ये पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणूनही ते काम करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नॅशनल रिलीफ फंडचे प्रमुख आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त म्हणूनही ते सध्या काम पाहत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती