दहीहंडीही फोडल्यामुळे शाहरुखविरुद्ध फतवा जारी

शनिवार, 8 सप्टेंबर 2018 (15:49 IST)
गोकुळाष्टमीच्या निमित्तानं शाहरुखनं मुंबईतल्या घरी दहीहंडीचा कार्यक्रम झाला. यात त्याने दहीहंडीही फोडली. या कार्यक्रमातले काही फोटो शाहरुखनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलाय. यानंतर अनेक मौलाना भडकलेत आणि त्यानी शाहरुखविरुद्ध फतवा जारी केलाय. शाहरुखनं एक हिंदू सण साजरा केला, असा आक्षेप घेण्यात आलाय. 
 
सोमवारी शाहरुखनं मुंबईतल्या आपल्या 'मन्नत' या घरी पत्नी गौरी, मुलगा अबराम आणि फॅन्ससोबत दहीहंडी फोडली. यामुळे उलेमा नाराज झालेत. शरियतनुसार हे कृत्य अनैतिक आणि हराम असल्याचं म्हटलंय. शाहरुख एक सेलिब्रिटी आहे, यामुळे कोणत्या धर्माचा सण कसा साजरा करावा याचं भान असणं त्याला आवश्यक आहे, असं 'फतवा ऑन मोबाईल सर्व्हिस'चे चेअरमन मुफ्ती अरशद फारुकी यांनी म्हटलंय. इतर धर्मातील सणांमध्ये सहभागी होणं वेगळी गोष्ट आहे परंतु, गैर-इस्लामिक सण आपल्या घरी साजणं करणं आणि त्या धर्माच्या परंपरांचं पालन करणं इस्लाममध्ये योग्य नाही असे म्हटले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती