मुंग्यांमध्ये पाहण्याची अद्भुत क्षमता असते. मुंग्यांचे दृश्य संवेदी गुणधर्म जाणून घेण्यासाठी एका ताज्या अध्ययनात त्यांच्या संयुक्त डोळ्यांच्या संरचनात्मक वैशिष्ट्यांचा शोध घेण्यात आला. मुंग्यांच्या डोळ्यांच्या क्षमतेवर शिकार करण्याची वेळ अवलंबून असते, असे दिसून आले.
या दोन्ही प्रजातींच्या डोक्याचा आकार, डोळ्यांचा व्यास, संयुक्त डोळ्याच्या पृष्ठभागावर आढळणार्या नेत्रांशकांची लांबी, मज्जातंतूशी संबंधित रेबडामची लांबी व मेंदूच्या आधारिय लेमिनाच्या रुंदीचे आकलन केले. या अध्ययनाचे प्रमुख डॉ. मार्टिन जे. बाबू यांनी सांगितले की, प्रत्येक संयुक्त नेत्राच्या पृष्ठभागावर हजारो षटकोनीय संरचना आढळून येतात, त्यांना नेत्रांशक म्हणतात.