राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु असताना आज दुपारी त्यांची प्राण ज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांचं पती श्रीनिवास पाटील, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचा जन्म 26 जुलै 1948 रोजी सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथे झाला. त्यांचा विवाह 16 मे 1968 रोजी खास. श्रीनिवास पाटील यांच्याशी झाला. त्यांना 'माई' या नावं ओळखायचे. त्यांनी उच्चशिक्षण घेतले असून जुन्या रूढी, परंपरा , संस्कृती जोपासली.