मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोमवारी सकाळी एक आवाहन केलं होतं त्यानंतर ती भूमिका बदल आता दुसरं आवाहन केलं आहे. राज ठाकरेंनी सकाळी कर्नाटक प्रश्नी एक ट्वीट केलं आहे. होतं. मात्र ते ट्वीट राज ठाकरेंनी हटवलं आहे. आधीच्या ट्वीटमध्ये सीमाभागातील मराठी उमेदवारांना निवडून द्या असा आशय आधीच्या ट्वीटमध्ये होता. मात्र आता जे ट्वीट राज ठाकरेंनी केलं आहे त्यामध्ये राज ठाकरेंनी काही तासात भूमिका बदलली आणि महाराष्ट्र एकीककरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या असं म्हटलं आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होतं आहे. आज प्रचार संपला आहे. अशात राज ठाकरेंनी एका दिवसात दोन भूमिका बदलल्याचं पाहण्यास मिळालं. कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक भूमिका राज ठाकरेंनी सकाळी मांडली होती त्यात त्यांनी म्हटलं होतं की सीमाभागातल्या मराठी उमेदवारांनाच निवडून द्या. मग अवघ्या काही तासांमध्ये भूमिका बदलत आधीचं ट्वीट डिलिट करून नवी भूमिका राज ठाकरेंनी मांडली या ट्वीटमध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या असं म्हटलं आहे.