Rain Update :या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळणार

रविवार, 14 ऑगस्ट 2022 (10:31 IST)
सध्या राज्यात विविध भागात पावसाची दमदार हजेरी सुरु आहे. राज्यात या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्यानं शक्यता वर्तवली आहे. मुंबई हवामान केंद्राने शनिवारीही रायगड, पुणे, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन यलो अलर्ट जारी केला आहे.14ऑगस्ट रोजी, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या राज्यातील काही भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
 
राज्यात अतिवृष्टी आणि पुरासारख्या घटनांमध्ये आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच 240 जनावरांनाही जीव गमवावा लागला आहे. पावसामुळे 300 हून अधिक गावांचे नुकसान झाले आहे. तसेच 95 जण जखमी झाले आहेत. पुण्यात ,औरंगाबाद,नाशिक, नागपूरात ढगाळ वातावरणाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. 
 
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या  जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार दिवस या चारही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. याशिवाय नांदेड जिल्हामध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती