Pune: पुण्याच्या स्टेशन परिसरात 7 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण

मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (23:03 IST)
पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्याच्या रेल्वे स्थानकापरिसरात एका सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.सदर घटना सोमवारी दुपारी घडली आहे. या प्रकरणी बंड गार्डन पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात पॉस्को आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.  या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

पीडित 7 वर्षीय मुलगी पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात असलेल्या तिच्या वडिलांच्या चहाच्या दुकानात त्यांना डबा देण्यासाठी आली आणि घरी परत जाताना एका अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण करून तिला तिला फलाट क्रमांक 6 च्या भिंतीलगत कंस्ट्रक्शन ऑफिसच्या शेजारील रेल्वेच्या बंद असलेल्या आयओडब्लयू खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. नंतर आरोपीने तिला ठार मारण्याची धमकी दिली. नंतर ही मुलगी लघुशंकेच्या बहाणा करून बाहेर पडून आरोपीच्या तावडीतून सूटली आणि तिने घरी येऊन घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला.

नंतर मुलीच्या पालकांनी तातडीनं बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल केली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरु केला असून अद्याप आरोपी फरार आहे. यापुर्वी देखील पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून एका अल्पवयीन मुलीला नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली होती, रिक्षाचालकाने तिला नेले होते.या घटनेने पुणे शहर हादरले असून महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती