राज्यात 12 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

शनिवार, 28 मे 2022 (10:08 IST)
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मान्सूनपूर्व पावसामुळे दिलासा मिळाला आहे. राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाने  थैमान घातले आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात मेघसरी कोसळल्या. या मुळे हवेत गारवा आला आहे. 

मान्सूनचा श्रीलंकेतुन पुढील प्रवास सुरु झाला आहे. येत्या 48 ते 72 तासात मान्सूनची केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.   

येत्या 30 आणि 31 मे रोजी राज्यात मान्सूनपूर्व पावसाचं अलर्ट देण्यात आले आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात हवामान खात्यानं वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. 
रत्नागिरी -सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट या भागात 30 मे रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती