मनमाड : सौ.नैवेद्या बिदरी : शहरातून जाणाऱ्या इंदौर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे ओव्हर ब्रिजचा कठडा पहाटे पाच वाजेच्या सुमारास खचल्याने दुर्घटना घडली आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची चर्चा जरी असली तरी मोठ्या प्रमाणात पुलाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग खचल्याने पडलेल्या ढगाराखाली काय निघते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वेचा ओवर ब्रिज हा ब्रिटिश कालीन असून शहराचा दोन भाग जोडणारा हा ओव्हर ब्रिज आहे.मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास या ओवर ब्रिजचा येवल्या बाजूकडील कठडा मोठ्या प्रमाणात खचला. या ओव्हर ब्रिजच्या पूर्व बाजूला दगड मातीचे ढिगार मोठ्या प्रमाणात कोसळा आहे.
दरम्यान इंदूर- पुणे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या असून या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.या मार्गावरील पुण्याकडील वाहतूक येवला येथून तर इंदौर येथून येणारी वाहतूक मालेगाव येथून वळवण्यात आली असल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.