बावधनमधूनही ‘सनर्बन’ रद्द

Webdunia
शनिवार, 16 डिसेंबर 2017 (09:52 IST)

पुण्यातील मुळशी तालुक्यातील लवळे आणि बावधन या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या ऑक्सफर्ड गोल्फ क्लब परिसरात महिनाअखेरीस होणार्‍या सनबर्न या कार्यक्रमास दोन्ही गावातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध सुरू केला आहे. जेथे हा कार्यक्रम होणार आहे. त्याठिकाणी जाऊन सुरू असलेले काम ग्रामस्थांनी बंद पाडले. 

सनबर्न फेस्टिवलला देण्यात आलेले ना हरकत प्रमाणपत्र लवळे ग्रामपंचायतीने (ता. मुळशी) जनमताच्या विरोधानंतर अखेर शुक्रवारी रद्द केले. त्यामुळे आता बावधनमधूनही ‘सनर्बन’च्या आयोजकांवर बस्तान गुंडाळण्याची वेळ आली आहे.  ग्रामपंचायतीत झालेल्या विशेष ग्रामसभा बैठकीत हा निर्णय झाला.

संबंधित माहिती

पुढील लेख