याविषयी दुधाळ म्हणतात की, 'हा उपाय स्वस्त असून गाडीचा रंग किंवा पृष्ठभागावर कोणतेही परिणाम करत नाही. यामुळे आतील वातावरण सुमारे ७ ते ८ अंशांनी कमी होते. हल्ली तर मी एसी न वापरताही गाडीत बसू शकतो. पर्यावरणपूरक असलेल्या उपायात एकच अडचण म्हणजे शेण लावल्यावर काही तास त्याचा वास येतो मात्र गाडी पूर्ण वाळल्यावर हा वासही जातो असे म्हटले आहे.