सोमवारी त्यांनी मुंबई ते कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अनेक तास रोखला.
राज्यात पंढरपूर, नेवासा, लातूर येथे धनगर समाजाचे लोक उपोषणाला बसले असून आरक्षणाची मागणी करत आंदोलन सुरु केले आहे. आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी आणि अनुसूचित जमातींमधून आरक्षण मिळावे या साठी आता धनगर समाज लढत आहे. त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.सोमवारी बीड जिल्ह्यात अंबाजोगाई, केज, परळी मध्ये रस्ता रोको आंदोलन केले.
या वेळी रस्त्यावर वाहनांची मोठी रांग दिसत होती. राज्यात धनगड जमात अस्तित्वात नसून धनगर असल्याचे शपथपत्र राज्य सरकार ने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहे. त्या अनुषंगाने सरकार ने आरक्षणाचा अध्यादेश काढावा छत्रपती संभाजी नगर येथे काही धनगर बांधवांनी धनगड जातीचे बनावट दाखले काढले आहे. ते बनावट दाखले रद्द करण्यात यावे.आणि अनुसूचित जमातीच्या यादीत 36 क्रमांकाला असलेल्या धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्ती करुन अनुसूचित जमातीचे दाखले वितरीत करण्याची मागणी धनगर समाजाचे आंदोलक करत आहे.