पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांत महाराष्ट्र, केरळ आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांचा दौरा करणार आहे. पंतप्रधान मोदी आज सकाळी १०:३० वाजता महाराष्ट्राची राजधानी मुंबईत जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचे उद्घाटन करतील.
तसेच उद्या केरळमधील विझिंजम आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय बंदराचे उद्घाटन करतील. भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) च्या प्रसिद्धीपत्रकात पंतप्रधानांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याची माहिती देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) त्यांच्या x हँडलवर पंतप्रधान मोदींच्या आजच्या कार्यक्रमाची माहिती दिली आहे.