मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील बिदरमध्ये चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप आहे. शाळेच्या वेळेत मुलीवर बलात्कार झाल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. मुलीच्या आईला मुलीचे कपडे बदलत असताना ही गोष्ट कळली. बिदर महिला पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार वर्षांची मुलगी सध्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी २१ वर्षीय पुरूषाला अटक करण्यात आली आहे.