Thane News: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी बुधवारी एका व्यक्तीला त्याच्या ३८ वर्षीय लिव्ह-इन पार्टनरची कथितरित्या हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी सुभाष भोईर याने गेल्या आठवड्यात ठाकुर्ली परिसरात घरगुती वादातून महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला केला होता.