दि . ८/११/२०२२ ला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची प्रा.तांबे यांच्या अध्यक्षते खाली पार पडलेल्या बैठकीत न्या. नरेंद्र चपळगावकर यांची निवड झाल्याची घोषणा केली . तसेच यंदाचे संमेलन ३,४,आणि ५ . फेब्रुवारी २०२३ रोजी वर्धा येथील. स्वावलंबी शाळेच्या पटांगणात होणार आहे . उद्घाटन सकाळी १०.३० वाजता होणार आहे त्या पूर्वी मंडळाचे ध्वजारोहण होईल .ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ .भारत ससाणे यांच्या हस्ते होईल ,मूलाखत ,परिसंवाद प्रकाशन कट्टा,वचक कट्टा ,कवी संमेलन ,कवी कट्टा आदि कार्यक्रम होतील.
ग्रंथ प्रसारणाला चालना देण्याच्या हेतूने १८६५ साली पहिले अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले होते व ,न्या.रानडे यांनी मराठीतून प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा घेतला व मराठी साहित्यीकाना एकत्र आणण्याचे ठरवले . व त्यासाठी चे आव्हाहन २/७/१८७८ मध्ये प्रसिद्ध झाले ,आणि या अहवाला नुसार ११/५/१८७८ रोजी सांयकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी साहित्याचे पहिले संमेलन भरले . या संमेलनाचे अध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषवले .दुसरे संमेलन त्या नंतर सात वर्षांनी (१८९५ ) पुण्यातच कृष्ण्शात्री राजवाडे यांच्या अध्यक्षते खाली भरले .तिसरे संमेलन भरण्यासाठी त्यानंतर वीस वर्षांचा कालावधी लागला ,व हे संमेलन पुण्याबाहेर १९०५ मध्ये साताऱ्यात भरले.
चौथे संमेलन १९०६ मध्ये पुण्यामध्ये भरले याच संमेलनामध्ये २७ मे रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना करण्यात आली या सगळ्या मध्ये टिळक ,केळकर ,खाडिळकर या मंडळींचा समावेश होता .आणि स्वाभाविक पणे या पुढे होणाऱ्या साहित्य संमेलनाची जवाबदारी परिषदेवर आली .अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद लाभणे हा त्या व्यक्तीचा सर्वोच गौरव समजला जातो.
साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षास प्रत्यक्षात विशेष असे काहीच अधिकार नसतात. संमेलनातील ठरावांची कार्यवाही महामंडळ करते. ही मराठी साहित्य संमेलने साधारणपणे तीन दिवस भरतात. स्वागत, उद्घाटन, अध्यक्षीय भाषण यांमध्ये पहिला दिवस व्यतीत होतो. नंतरच्या दोन दिवसांत वाङ्मयचर्चा, परिसंवाद, कथाकथन, काव्यगायन, विषयनियामक समितीत मंजूर झालेल्या ठरावांच्या आधारे खुले अधिवेशन, अध्यक्षीय समारोप व शेवटी आभारप्रदर्शन असे त्याचे स्वरूप असते.