राज्यात पुन्हा तापमान वाढीची शक्यता

मंगळवार, 30 मार्च 2021 (20:48 IST)
काही दिवसांत राज्यातील विविध जिल्ह्यात तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. दोन दिवसांपूर्वी चंद्रपुरातील तापमान 42 अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचलं होतं. अशावेळी आता नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात 3 दिवस मॉडरेट हिट व्हेवचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 
राज्यात मार्च महिन्यातच उन्हाचे चटके अतिशय तीव्रतेने जाणवू लागले आहेत. विदर्भ, मराठवाडाच्या काही जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंशांपर्यंत पोहोचला आहे. कोकणातही तापमान वाढ नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी रत्नागिरीचं तापमानही 40 अंश सेल्सियस नोंदवण्यात आलं आहे. तिकडे नागपूरसह विदर्भात तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. राज्यात पुन्हा तापमान वाढीची शक्यता नोंदवण्यात आली आहे. विदर्भ आणि विदर्भाला लागून असलेल्या मराठवाड्यातील काही भागात तापमान वाढीचा अंदाज हवामान खात्याकडून नोंदवण्यात आलाय. काही शहरातील तापमान 42 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती