पोलिसांनी खाकी वर्दी घालून नाचू नये, महासंचालकांकडून स्पष्ट सूचना जारी

मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (15:16 IST)
यापुढे महाराष्ट्र पोलिसांनी खाकी वर्दी घालून नाचू नये, अशा स्पष्ट सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत अनेक पोलिसांचे नाचतानाचे व्हिडीओ समोर आले होते. या व्हिडीओवरुन सोशल मीडियावर बरीच झाली. यानंतर पोलीस महासंचालकांनी या सगळ्या प्रकारणात गंभीर दखल घेत सूचना जारी केल्या आहेत.
 
फक्त मुंबईतच नव्हे तर पुणे, कोल्हापूरमध्ये पोलिसांनी गणेश मिरवणुकीत सहभाग घेतल्याचे दिसून आले होते. इतकेच काय तर ढोल वाचवणे, वैयक्तिक पातळीवर भाषणे करणे, असे प्रकारही सोशल मीडियात व्हायरल झाले होते.  त्यावरुन वादही उफाळून आला होता. यानंतर सगळ्या प्रकाराची पोलीस खात्याकडून गंभीर दखल घेण्यात आली असून राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयतूनकडून अधिकृत पत्रक जारी करत पोलिसांना सूचना करण्यात आल्या आहेत.
 
दोन दिवसांपूर्वीच खाकी वर्दीत नाचू नका, अशा सूचना मुंबई पोलिसांना अतिरिक्त पोलिस महासंचालकांनीही दिल्या . गणवेशात नाचताना आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. दरम्यान, आता राज्य पोलीस महासंचालक कार्यालयातूनच सर्व पोलिसांनी शिस्त पाळण्याच्या आणि कर्तव्यावर असताना गणवेशात नाचू नये, असे सांगण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती