अवैधरित्या जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार स्फोटक अधिनियम द्रव्य पदार्थ व सहजीवनमापे कलम अंमलबजावणी अंतर्गत ही कारवाई करुन ओमसाई बायो एनर्जी प्रा. लि. कंपनीचा मालक रमेश किसन कानडे याच्यासह त्याचा मुलगा सुयोग रमेश कानडे, राजेंद्र बबन चव्हाण, अझर नूरमोहम्मद खान, अनिल महादू माळी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सिन्नर औद्योगिक वसाहतीमध्ये बायोडिझेलचा व्यवसाय केला जात असल्याचे पोलिसांनी कळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर या ओमसाई बायो एनर्जी प्रा. लि. कंपनीतून टँकर बाहेर पडल्यानंतर पोलिसांनी टँकरचा पाठलाग केला. या टँकरची तपासणी केल्यानंतर बायोडिझेल असल्याचे आढळले. या कंपनीचे मालक रमेश किसन कानडे यांनी फर्निश ऑईलचा परवाना शासनाकडून घेतला होता. या परवान्यावर फर्निश ऑईचे फक्त बिल तयार केले करुन टँकरमधून बायोडिझेलचा पुरवठा केला जात होता.